राज्यपालांची भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रतिज्ञा

 Malabar Hill
राज्यपालांची भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रतिज्ञा
राज्यपालांची भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रतिज्ञा
See all

मलबार हिल - दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोमवारी राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसंच तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली.

जीवनाच्या सर्व क्षेत्रातून भ्रष्टाचाराचे उच्चाटण करण्याची तसंच कार्यक्षेत्रात सचोटी आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा या वेळी कर्मचाऱ्यांनी घेतली.  या वेळी राज्यपालांनी भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला  १४१व्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. 

Loading Comments