Advertisement

राजभवनाखाली बंकर


राजभवनाखाली बंकर
SHARES

राजभवन. ब्रिटिशकालीन शैली आणि गुप्ततेच्या वास्तूचा हा इतिहास नव्याने समोर आल्यानं राजभवनाचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालंय. राजभवनच्या पश्चिम बाजूला एक छोटीशी भिंत होती. त्या भिंतीच्या आत बंकर असल्याचं आजपर्यंत बोललं जात होतं. 12 ऑगस्टला ही भिंत दूर करण्यात आली. त्यानंतर जे समोर दिसले ते केवळ अद्भुत होतं. तब्बल 20 फूट उंचीचा लोखंडी भक्‍कम गेट दिसला. गेटमधून आत गेल्यावर तब्बल तेरा मोठ्या खोल्या. यामध्ये हवा आणि प्रकाश येण्यासाठी केलेली सुसज्ज व्यवस्था. खोल्यांतून पाण्याचा निचरा होणारी अप्रतिम यंत्रणा. सर्व काही जसंच्या तसं जागच्या जागी. ब्रिटिशांनी हे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारची उणीव ठेवलेली नसेल हे बघणा-याला नक्कीच वाटेल. शेल स्टोअर, गन शेल, कार्टेज स्टोर, शेल लिफ्ट, पंप, वर्कशॉप यांसारख्या नावाने या खोल्या आहेत. दीडशे मीटर लांबीचा भव्य आणि सुसज्ज बोगदा ब्रिटिश युवराज (प्रिन्स ऑफ वेल्स) 1875 ला मुंबईला भेट देणार होते. त्यासाठी त्यांची सुरक्षा आणि त्याबाबतच्या गुप्त बैठका, यासाठी हे बांधकाम केल्याचा दावा करण्यात आलाय. या वेळी या जागेवर तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्याचे कार्यालय होते असंही सांगितल जातंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा