...तर राज्य सरकारला मिळतील 200 कोटी!

 wadala
...तर राज्य सरकारला मिळतील 200 कोटी!

वडाळा - "राज्य सरकारने स्वतःची ऑनलाईन इंटरनेट लॉटरी सुरू करावी, जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगार प्राप्त होईल आणि सरकारला 200 कोटी रुपयांचा महसूल मिळेल", अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी अभिकर्ता विक्रेता सेनेचे अध्यक्ष रमाकांत आचरेकर यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

"लॉटरी व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 200 कोटी रुपये कराच्या स्वरूपात शासनाला महसूल मिळत असतो. आजतागायत लॉटरीच्या माध्यमातून सुमारे 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप बक्षिसांच्या स्वरूपात करण्यात आले आहे. त्यामुळे लॉटरी कराच्या माध्यमातून राज्य सरकारला महसूल मिळतो. परंतु जर महाराष्ट्र शासनाने स्वतःची ऑनलाईन इंटरनेट लॉटरी सुरू केली तर शासनाच्या महसुलात भरघोस वाढ होईल. मात्र भविष्यात सरकारने स्वतःची ऑनलाईन लॉटरी सुरू न केल्यास लॉटरी अभिकर्ता विक्रेता सेना जनआंदोलन करेल", असा इशारा आचरेकर यांनी दिला आहे.

Loading Comments