नेते लागले निवडणुकीच्या तयारीला

 Antop Hill
नेते लागले निवडणुकीच्या तयारीला

सायन - महानगर पालिकेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सगळ्या पक्षांमध्ये पाहायला मिळतेय. पक्षात असणारे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीआधी मार्गदर्शन करताना दिसत आहेत.

6 फेब्रुवारीला अँटॉप हिल येथे सायन कोळीवाड्याच्या शिवसेना महिला विभाग संघटक रीटा वाघ यांनी विभागातील महिला कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. निवडणुकीत कसे काम केले पाहिजे? तसेच कशाप्रकारे जनतेत सक्षम कार्यकर्ते म्हणून वावरावे याचे मार्गदर्शन रीटा वाघ यांनी केले. महिला कार्यकर्त्यांनीही त्याला प्रतिसाद देत येत्या निवडणुकीत प्रचारादरम्यान मेहनत घेऊ असे आश्वासन दिले.

Loading Comments