गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची व्यावसायिकांना साद

 Vidhan Bhavan
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची व्यावसायिकांना साद
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची व्यावसायिकांना साद
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची व्यावसायिकांना साद
See all

नरिमन पॉइंट - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मुंबईतील व्यावसायिकांशी संवाद साधला. गुजरातमध्ये जानेवारीत व्हायब्रंट गुजरात समित 2017 हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं व्यावसायिकांनी सहभाग नोंदवावा, यासाठी हा संवाद होता. उपस्थित व्यावसायिकांना त्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रितही केलं.

गुजरातचा विकास संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटलं. आधीच्या केंद्र सरकारनं या उपक्रमाला पाठिंबा दिला नव्हता, मात्र आता केंद्र सरकारही पाठिंबा देत आहे असंही ते म्हणाले. 120 पेक्षा अधिक देशातील व्यावसायिक यात सहभाग नोंदवणार आहेत. गुजरातमध्ये नव्यानं निर्माण झालेल्या गेब सिटीचं 9 जानेवारीला उद्घाटन करणार असल्याची माहिती रुपानी यांनी दिली. चीन आणि जपान सोबत व्यावसायिक करार केलं आहे, अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत, असंही रुपानी यांनी स्पष्ट केलं.

Loading Comments