Advertisement

'हाजी अराफत हटाव', मुस्लिम पदाधिकाऱ्यांची मागणी


'हाजी अराफत हटाव', मुस्लिम पदाधिकाऱ्यांची मागणी
SHARES

महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे ठरवत मुस्लिम कार्यकर्त्यांना शिवसेनेत योग्य मानसन्मान मिळत असल्याचा दावा शिवसेनेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शेख यांच्या आरोपांमुळे मुस्लिम समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप करत या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी शेख यांची शिवसेनेच्या सर्व पदांवरून हकालपट्टीची मागणी केली आहे.

शिव व्यापारी सेनेचे चिंटू शेख, महाराष्ट्र वितरक सेनेचे खालीद मामू, अवजड वाहतूक सेनेचे जसविंदर भाटिया यांच्यासह मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन हाजी अराफत यांच्यावर हे आरोप केले आहेत. पक्षाने हाजी अराफत यांची त्वरीत हकालपट्टी करावी. त्यांची हकालपट्टी केली नाही, तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला.



शिवसेनेत मुस्लिम समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने शेख हे इतर राजकारण्यांकडून सुपारी घेऊन हे आरोप करत असावेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘अराफत हटाव, कचरा हटाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

पत्रकार परिषद घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी पत्रकार संघाच्या प्रांगणात निदर्शने करुन व हातावर काळी पट्टी बांधून शेख यांचा निषेध नोंदवला. शिवसेनेने कधीही जातीयवाद केलेला नाही. सर्व पक्षांपेक्षा शिवसेनेत मुस्लिम समाजाला जास्त महत्त्व व मान मिळतो, असा दावा यावेळी करण्यात आला. जकात बंद झाल्याने काही जणांचे धंदे बंद झाले आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

शिवसेना पुरस्कृत विविध वाहतूक संघटना व माथाडी संघटना बरखास्त करून एकच महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेची स्थापना करण्यात आली. मात्र शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानंतरही या संघटना आपापल्या ठिकाणी स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. त्यामुळे पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची नाराजी शेख यांनी बुधवारी जाहीरपणे व्यक्त केली होती. शेख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढली असून शेख यांना भाजपा प्रवेशाची ऑफर असल्याची चर्चा आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा