बातचीत पहिल्या भूमिपुत्र महापौरांशी

Dadar , Mumbai  -  

दादर - मुंबईचे पहिले भूमिपुत्र महापौर हरेश्वर पाटील यांनी शुक्रवारी मुंबई लाइव्हच्या न्यूजरूमला भेट दिली. या वेळी त्यांनी मुंबई लाइव्हच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांना सडतोड उत्तरे देत महापौरपदापासून आजतागायतचा प्रवास उलगडला. या वेळी ते म्हणाले की, पक्ष बदलणं हे गैर नाही कारण जर आपल्याला एखाद्या पक्षात योग्य स्थान मिळत नसेल तर तो पक्ष नक्की बदलावा. घराणेशाहीबाबत विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी घराणेशाही का करू नये, असं म्हणतं घराणेशाही होतेच असं सांगितलं. घरचा माणूसच आपला असतो, त्यामुळे घराणेशाही होतेच, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. येत्या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपा नंबर वन असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading Comments