दहीसरमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना

Dahisar, Mumbai  -  

दहीसर - घोसाळकर आणि म्हात्रे वाद दहिसरमधील लोकांना काही नवा नाही. मात्र हा वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. आचारसंहितेचा उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी आपल्याच पक्षातील माजी महापौर शुभा राऊळ, प्रभाग अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेवक अवकाश जाधव आणि आयोजक दत्ता कोसंबे विरोधात निवडणूक आयोग आणि मातोश्रीवर तक्रार केली. 14 तारखेला शिवसेनेच्या वतीने बोरीवली पश्चिममधील आयसी कॉलनीमध्ये कर्मयोगी उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी महापौर शुभा राऊळ, शीतल म्हात्रे उपस्थित राहिल्या होत्या. मात्र हा कार्यक्रम परवानगी घेऊनच करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Loading Comments