राणेंच्या समर्थनार्थ होमहवन

मुलुंड -  नारायण राणेंना विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेता पद  मिळावं म्हणून मुलुंडमध्ये राणे सर्मथकांनी होम हवन केलंय. नेहमीच आपल्या आक्रमक स्वभावामुळे नारायण राणेंनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यातच युतीच्या काळात विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावणाऱ्या राणेंनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडल होतं. त्यामुळे राणेंना विरोधी पक्षनेता पद मिळावं असं राणे समर्थकांना वाटतंय.

नारायण राणेंचा राजकारणातला दांडगा अभ्यास पाहता राणेंना विधान परिषदेचं विरोध पक्षनेते पद मिळालं तर ते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतील यात शंका नाही. मात्र काँग्रेसमधील अंर्तगत बेबनाव, त्यात राणेंनी थेट प्रदेशाध्यक्षांवर नगरपंचायतीच्या निकालानंतर केलेला आरोप पाहता, काँग्रेस राणेंच्या नावाचा विचार करेल का? हे पाहावं लागेल.

Loading Comments