अमित शाहांचा 'संपर्क फाॅर समर्थन' दौरा सुरू असताना काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठं तरी भीती वाटतेय की, आपण राज्य सरकार आणि शहा यांना घेराव घालू. याच भीतीपोटी बुधवारी सकाळपासून आपल्या घरात, बिल्डिंगमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून ही नजरकैद आहे आणि हे जाणीवपूर्वक केलं जात असल्याचा आरोप निरूपम यांनी केला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते दिवसभर नामवंत व्यक्तिंसह मातोश्रीवर जाऊन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे. अमित शाहांचा 'संपर्क फाॅर समर्थन' दौरा सुरू असताना काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे.
म्हणून नजरकैदेत ठेवलं
अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठं तरी भीती वाटतेय की, आपण राज्य सरकार आणि शहा यांना घेराव घालू. याच भीतीपोटी बुधवारी सकाळपासून आपल्या घरात, बिल्डिंगमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून ही नजरकैद आहे आणि हे जाणिवपूर्वक केलं जात असल्याचा आरोप निरूपम यांनी केला आहे.
सकाळपासून पोलिस तैनात
आपल्या लोखंडवाला परिसरातील घराबाहेर आणि बिल्डिंगमध्ये सकाळपासून पोलिस तैनात आहेत. याविषयी या पोलिसांना विचारलं असता त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या अादेशानुसार या ठिकाणी तैनात झाल्याचं सांगितल्याची माहिती निरूपम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आपण कोणताही गुन्हा केलेला नसताना, बुधवारी कुठंही आंदोलन नसताना आपल्याला पोलिसांच्या नजरकैदेत का ठेवण्यात आलं?, असा सवालही त्यांनी केला.
'यांना माझी भीती वाटते'
निरूपम यांच्या घरात आणि बिल्डिंगमध्ये पोलिस तैनात आहेतच, पण पोलिसांकडून आपल्याला बाहेर जाण्यापासून रोखण्यात येत असल्याचा आरोपही निरूपम यांनी केला आहे. तर शाह आणि मुख्यमंत्र्यांनी कुठं तरी आपली भीती वाटत असल्यानंच आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -
अमित शाह मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री' भेटीचं काय?
राज्यपालांना दिली कुत्र्याची उपमा, निरूपम सोशल मीडियावर ट्रोल