Advertisement

राज्यपालांना दिली कुत्र्याची उपमा, निरूपम सोशल मीडियावर ट्रोल

आपल्या चुकीची जाणीव होताच, निरूपम यांनी त्वरीत ट्विटरवर माफीही मागितली. मात्र, माफी मागताना त्यांनी वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

राज्यपालांना दिली कुत्र्याची उपमा, निरूपम सोशल मीडियावर ट्रोल
SHARES

नेहमीच वादग्रस्त विधान करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम पुन्हा एकदा चर्चेत आलेत. कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा पार करू असा दावा करणारे भाजपाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना अवघ्या काही तासांतच राजीनामा द्यावा लागला. यामुळे आनंदून गेलेल्या निरूपम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटकमधील राज्यपाल वजुभाई वाला यांना अतिउत्साहाच्या भरात 'भाजपाचा प्रामाणिक कुत्रा' अशी उपाधी चिकटवली. मात्र नाराज झालेल्या भाजपा समर्थकांनी निरूपम यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात करताच त्यांना उपरती झाली आणि निरूपम यांनी आपल्या विधानाची सारवासारव केली.


काय म्हणाले निरूपम?

बहुमतासाठी पुरेसं संख्याबळ नसूनही कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी प्राधान्य दिल्याने निरूपम यांनी त्यांना उद्देशून कुत्र्याची उपमा दिली. ते म्हणाले ''वजुभाई वाला यांनी देशात अज्ञाधारकतेचा नवा किर्तीमान स्थापित केला आहे. यामुळे देशातील प्रत्येकजण आपल्या कुत्र्याचं नाव विजुभाई वाला असंच ठेवेल. कारण त्यांच्यापेक्षा जास्त आज्ञाधारक कुणी असूच शकत नाही.''


ट्विटरवर माफी

आपल्या चुकीची जाणीव होताच, निरूपम यांनी त्वरीत ट्विटरवर माफीही मागितली. मात्र, माफी मागताना त्यांनी वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी केली.


 

प्रकरण काय?

बहुमत नसतानाही राज्यपालाच्या निमंत्रणावरून बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा वेळ दिला. याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ दिली.

परंतु आमदारांचं पुरेसं संख्याबळ नसल्याने बहुमत सिद्ध करण्याआधीच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानुसार आता कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार येणं अपेक्षित आहे. काँग्रेसचं सरकार आल्यावर वजुभाई वाला यांच्यावर आणखी आरोप होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

कर्नाटकात काँग्रेसचंच सरकार- अशोक चव्हाण

रिलायन्सने ठोकला संजय निरूपम यांच्यावर १ हजार कोटींचा दावा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा