Advertisement

रिलायन्सने ठोकला संजय निरूपम यांच्यावर १ हजार कोटींचा दावा

रिलायन्स ग्रुपने संजय निरूपम यांच्यावर तब्बल १ हजार कोटींचा दावा ठोकला आहे. तसेच, बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात निरूपम यांच्याविरोधात अवमान याचिकाही दाखल करण्याच्या तयारीत रिलायन्स आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे रिलायन्सने ही माहिती दिली आहे.

रिलायन्सने ठोकला संजय निरूपम यांच्यावर १ हजार कोटींचा दावा
SHARES

रिलायन्स उद्योग समूह आणि गौतम अदानी यांच्यामध्ये झालेल्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गैरप्रकाराचा आरोप करणारे संजय निरूपम वादात अडकण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत होणाऱ्या वीज दरवाढीसाठी रिलायन्स आणि अदानी यांच्यात झालेल्या व्यवहाराला जबाबदार ठरवले होते.


'निरूपम यांचे आरोप बिनबुडाचे'

रिलायन्स ग्रुपने संजय निरूपम यांच्यावर तब्बल १ हजार कोटींचा दावा ठोकला आहे. तसेच, बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात निरूपम यांच्याविरोधात अवमान याचिकाही दाखल करण्याच्या तयारीत रिलायन्स आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे रिलायन्सने ही माहिती दिली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची वीज पुरवठादार कंपनी गौतम अदानी यांनी खरेदी केली. मात्र, तोट्यातली कंपनी १८ हजार कोटींना खरेदी का केली गेली? असा सवाल निरूपम यांनी उपस्थित केला होता. तसेच, फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या रफेल फायटर एअरक्राफ्टच्या खरेदीशीही या व्यवहाराचा संबंध त्यांनी जोडला होता.


'आरोप ७२ तासांमध्ये मागे घ्यावेत'

हे आरोप संजय निरूपम यांनी ७२ तासांमध्ये मागे घ्यावेत असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच, खात्रीशीर माहिती असल्याशिवाय रिलायन्सबद्दल कोणतेही स्टेटमेंट करू नये, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २०१४मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी संजय निरूपम यांना अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करू नयेत असे आदेश दिले होते. त्याच आधारावर न्यायालय अवमान याचिका दाखल करण्याच्या तयारीत रिलायन्स आहे.



हेही वाचा

अदानी-अंबानींच्या 'या' व्यवहारामुळेच मुंबईत वीज दरवाढ?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा