Advertisement

नगरसेवकांच्या बॅनरबाजीला मतदार भुलतील का?


नगरसेवकांच्या बॅनरबाजीला मतदार भुलतील का?
SHARES

वरळी - वॉर्ड पुर्नरचनेत अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले गड गमवावे लागले.त्यामुळे त्यांच्यावर नवीन वॉर्डमधून निवडणूक लढवण्याची वेळ आलीय. या नवीन वॉर्डमधील जनतेला आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांनी आता एक नामी शक्कल लढवलीय. वरळीचे वॉर्ड क्रमांक 187 चे मनसे नगसेवक संतोष धुरी ही यात आता मागे नाहीत. संतोष धुरी यांचा वॉर्ड गायब झाल्यामुळे त्यांनी याआधी नगरसेवक पदावर असताना केलेल्या कामाची जणू पोस्टरबाजी केलीय. त्यामध्ये गटार साफ करणे ते विद्यार्थ्यांच्या गुणगौरवापर्यंतचे सर्व काही एकाच बॅनरवर पाहायला मिळतेय.मात्र निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर लोकांना आकर्षित करण्याचा हा स्टंट असल्याची नाराजी इथल्या नागरिकांनी व्यक्त केलीय. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत असे किती बॅनर लोकांना पाहावे लागतील देवचं जाणो. असो या बॅनरबाजीचा फायदा नगरसेवकांना होणार का हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा