Advertisement

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती


शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती
SHARES

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समितीचे काम चालणार आहे. ही समिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी चर्चा करून आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या या समितीत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे. ही समिती सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

कोणतेही प्रश्न हे चर्चेतूनच सोडविले जात असतात आणि शेतकर्‍यांच्या सर्व प्रश्नांवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केला आहे. त्या अनुषंगाने या उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांनीसुद्धा चर्चेतून मार्ग काढावा. 

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा