Advertisement

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार, उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार, उच्च न्यायालयाचा आदेश
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात असं स्पष्ट केलं.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. परमबीर सिंग यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र,  सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती.

आरोप गृहमंत्र्यांविरोधात आहेत, त्यामुळे तपास निःपक्षपाती व्हावा यासाठी सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे. 



हेही वाचा

कोरोनाग्रस्तांनी मदतीसाठी 'वॉर्ड वॉर रूम'शी संपर्क साधावा

महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा