भुजबळांचा जेजेतला फोटो व्हायरल


  • भुजबळांचा जेजेतला फोटो व्हायरल
SHARE

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जेजे रुग्णालयातला फोटो व्हायरल झालाय. पांढरी दाढी, पांढरे केस या रुपातील भुजबळ रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये चालताना दिसतायेत. गेल्या काही दिवसांपासून जेजे रुग्णालयात दाखल असलेल्या छगन भुजबळ यांची अँजिओग्राफी करण्यात येणार होती. पण त्यांनीच नकार दिल्यामुळे त्यांची रवानगी आता पुन्हा आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.

दरम्यान भुजबळ यांनी जामिनासाठी केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं बुधवारी फेटाळून लावली. त्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या