Advertisement

‘फ्री काश्मिर पोस्टर’ झळकवल्या प्रकरणी चौकशी करू- अनिल देशमुख

या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’ चे फलक मेहक मिर्झा नावाच्या मुलीने झकवल्याने नवा वाद निर्माण झाला.

‘फ्री काश्मिर पोस्टर’ झळकवल्या प्रकरणी चौकशी करू- अनिल देशमुख
SHARES

जेएनयूमध्ये झालेल्या हल्याच्या निषेधार्थ गेटवे येथे करण्यात आलेल्या आंदोलनात झळकवण्यात आलेल्या फ्री काश्मिरच्या पोस्टरची चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. हा फलक देशभरात चर्चेचा विषय झाला आहे. 'गेटवे ऑफ इंडिया' येथे आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हाही नोंद झाला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवनात सांगितले.


जेएनयूमध्ये झालेल्या हल्याचे पडसाद देशभर उमटू लागले. त्यात सेलिब्रिचींनी ही उडी घेत या हल्याचा निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे 'गेट वे' वरील आंदोलन चर्चेचे ठरले. मात्र या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’ चे फलक मेहक मिर्झा नावाच्या मुलीने झकवल्याने नवा वाद निर्माण झाला.  या फलकासंदर्भात आंदोलक महेकने तिची सोशलमिडियावरून पाठवलेल्या व्हिडिओमधून भूमिका स्पष्ट केली. मात्र मेहकच्या या मागील भूमिकेची चौकशी करून त्यांनी इतरांना पाठवलेल्या अन्य संदेशाची ही चौकशी करू, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. महेक यांनी दर्शवलेल्या फलकावरून त्यानी थेट स्वतंत्र काश्मीरची मागणी केली असा त्याचा अर्थ होत नाही.

काश्मीरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. तेथील इंटरनेट सेवाही सुरळीत नाही. अनेक नेत्यांना डांबून ठेवण्यात आले होते. जमावाला भाषण बंदी आहे, या संदर्भात हा फलक असल्याचे प्रथम दर्शनी दिसते. तूर्तास 'गेटवे ऑफ इंडिया' येथे आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हाही नोंद झाला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान भवनात सांगितले.

हेही वाचा ः- विरार-डहाणू मार्ग लवकरच चौपदरीकरण होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा