Advertisement

घरगुती महिला कामगारांची स्थिती बिकट

कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन कालवधीमध्ये अनेक महिलांना रोजगाराला मुकावं लागलं आहे. दररोज कामावर गेल्याशिवाय कमाई होत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे अनेक महिलांना आर्थिक हालाखीला सामोरं जावं लागलं.

घरगुती महिला कामगारांची स्थिती बिकट
SHARES

कोरोना संकटामुळे घरकाम करणाऱ्या महिलांसमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या घरगुती कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्यासह महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या महिलांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही यावेळी ॲड. ठाकूर यांनी दिली. (household women workers delegation meets maharashtra women and child development minister yashomati thakur)

कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन कालवधीमध्ये अनेक महिलांना रोजगाराला मुकावं लागलं आहे. दररोज कामावर गेल्याशिवाय कमाई होत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे अनेक महिलांना आर्थिक हालाखीला सामोरं जावं लागलं. आता परिस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत असली तरी या महिलांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, अशी माहिती शहा यांनी दिली.

त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले घरगुती कामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करुन त्यामार्फत या कामगांरांच्या कल्याणाचे निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

घरगुती कामगार महिला या समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या. या महिलांचं आरोग्य, पोषण, मुलांचे शिक्षण, त्यांचे हक्क आदींसाठी शासन सकारात्मक पावले उचलेल, असं आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिलं.


हेही वाचा -

महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी सेवा सुरू

राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराकडे सरकारचं दुर्लक्ष- देवेंद्र फडणवीस
संबंधित विषय
Advertisement