भाजपाकडून पटेल दाम्पत्याला उमेदवारी

 Andheri
भाजपाकडून पटेल दाम्पत्याला उमेदवारी

अंधेरी - भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. अंधेरी विधानसभा क्षेत्रात वॉर्ड क्रमांक 76 मधून मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, वॉर्ड क्रमांक 81 येथे भाजपाकडून मुरजी पटेल यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांना उमेद्वारी देण्यात आली आहे.

केसरबेन पटेल या 2012 च्या पालिका निवडणुकीत अंधेरी विधानसभा वॉर्ड क्रमांक 73 एम.आय.डि.सी परिसरातून निवडुन आलेल्या विद्यमान नगरसेविका आहेत. मागील निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे लढवली होती. यंदाच्या निवडणुकीत या दाम्पत्याने भाजपा पक्षात प्रवेश केला.

Loading Comments