संपूर्ण मुंबईत उडणार पतंग - वारीस पठाण

  Byculla
  संपूर्ण मुंबईत उडणार पतंग - वारीस पठाण
  मुंबई  -  

  भायखळा - 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे भायखळ्यात पतंग उडवली तशी येत्या 21 तारखेला इतक्या पतंग उडवा ज्यामुळे पंज्याला टाटा आणि शिटी बंद व्हायला पाहिजे. फक्त एकच उमेदवार कुर्र्तुलाइन घांची यांची पतंग उडली पाहिजे असं आवाहन आमदार वारीस पठाण यांनी केलं. भायखळा स्टेशन मार्गावर झालेल्या सभेत ते बोलत होते. ही सभा प्रभाग क्रमांक 207 एमआयएमचे उमेदवार कुर्र्तुलाइन घांची यांच्या प्रचारानिमित्त घेण्यात आली. या सभेला एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाझ जलील आणि एमआयएमचे मुंबई अध्यक्ष शकीर पटनीही उपस्थित होते.

  आम्ही जाहीरनामा वगैरे मानत नाही. ते फक्त दाखवण्यापूर्ती असतात. आम्ही प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवतो. गेल्या अनेक दिवसांपासून एमआयएमचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध होणार असा प्रश्न केला जात होता. त्यालाच वारीस पठाण यांनी उत्तर दिलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.