'भाजपमध्ये प्रवेश ही केवळ अफवा'

Mumbai
 'भाजपमध्ये प्रवेश ही केवळ अफवा'
 'भाजपमध्ये प्रवेश ही केवळ अफवा'
See all
मुंबई  -  

ठाकूर व्हिलेज - महापालिकेच्या प्रभाग आरक्षणातील बदलामुळे अनेक नगरेसवक त्यांचा प्रभाग गेल्यामुळे धास्तावले आहेत. त्यामुळे अनेक जण पक्षांतर करत आहे. याच पार्श्वभूमीवर कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्स येथील नगरसेवक योगेश भोईर भाजपात प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला पुर्णविराम देण्यासाठी भोईर यांनी भाजपमध्ये जात नसल्याचे प्रसिध्दी पत्रकच काढले आहे. यामध्ये त्यांनी आपण काँग्रेस पक्षात असून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कुठल्याही पक्षात जाण्याचा विचारही केला नाही. तरीही काही प्रसार माध्यमे, सोशल मीडिया आणि विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत संबंधित माध्यमांनी खुलासा करावा अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.