Advertisement

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा-वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

महाविकास आघाडी सरकार कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने अश्विनी भिडे यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा-वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार
SHARES

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. तसेच तातडीने पदभार स्वीकारावा असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तत्कालीन ठाकरे सरकारने अश्विनी भिडे यांची मेट्रो 3 प्रकल्पाच्या संचालक पदावरुन उचलबांगडी करत मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळताच सत्तेत आलेल्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारने अश्विनी भिडे यांच्यावर मेट्रो 3 च्या संचालक पदाची जबाबदारी दिली आहे.

मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन २०२० साली जानेवारी महिन्यात बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्याच वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस करोना विषाणू व्यवस्थपानाची जबाबदारी सोपवण्यात आलेली. नंतर दोन महिन्यांनी म्हणजेच मे महिन्यात भिडे यांची मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी अश्विनी भिडे यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये न्यायालयाकडून मेट्रो कारशेडला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याविरोधात आंदोलन झालं. त्यावर तत्कालीन मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्विट करुन भूमिका मांडली होती. यात त्यांनी आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर टीका केली होती.

अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. डिसेंबर महिन्यात शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं होतं. त्यानंतर २०२० साली त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं होतं.



हेही वाचा

सदा सरवणकरांनी दिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ

मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज ठाकरेंचा निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा