Advertisement

नवाब मलिकांच्या खात्याची जबाबदारी कुणाला देणार?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार?

नवाब मलिकांच्या खात्याची जबाबदारी कुणाला देणार?
SHARES

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या खात्याची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलिकांच्या खात्यासाठी राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत आहेत.

नवाब मलिकांना राजीनामा द्यावा लागल्यास अल्पसंख्याक मंत्रालयासाठी दोन नावं चर्चेत आहेत. त्यात पहिलं नाव आहे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचे आणि दुसरं नाव आहे हसन मुश्रीफ यांचं. जितेंद्र आव्हाड सध्या गृहनिर्माण मंत्री आहेत तर हसन मुश्रीफ सध्या ग्रामविकास मंत्रालयाची धुरा संभाळत आहेत.

मलिकांनी राजीनामा दिल्यास अल्पसंख्याक खात्याचा पदभार या दोन्ही नेत्यांपैकी एकाकडे दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र शरद पवार काय निर्णय घेणार? यानंतरच स्पष्ट होईल.

यासाठीच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे असे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

महाराष्ट्रातील एक मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राजीनामा द्यावा लागला, एक आत आहेत, एका नेत्याचा अनधिकृत बंगला पाडण्यात आला, एका नेत्याचे अनधिकृत रिसॉर्ट आहे, एका मंत्र्याला दोन पत्नी आहेत. किती मोठी यादी आहे. काय चाललंय हे? कोलमडले आहे सगळं, अशी खोचक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

तर मलिक यांच्या अटकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीविरोधात जोरदार आंदोलन केले आहे.



हेही वाचा

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात होणार बैठक; गृहमंत्रीही उपस्थित राहणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा