Advertisement

तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, माजी नौदल अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर संताप

राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणं तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामा द्या, अशा शब्दांत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या, माजी नौदल अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंवर संताप
SHARES

राज्यात कायदा-सुव्यवस्था राखणं तुम्हाला जमत नसेल, तर राजीनामा द्या, अशा शब्दांत माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. शिवसैनिकांनी मदन शर्मा यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. (if you can't look after law & order then resign says madan sharma to maharashtra cm uddhav thackeray)

आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली. मदन शर्मा यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. 

मी जखमी आहे तसंच तणावाखाली देखील आहे. माझ्यासोबत जे काही घडलं, ते अतिशय दु:खद आहे. उद्धव ठाकरे तुम्ही कायदा-सुव्यवस्था सांभाळू शकत नसाल, तर राजीनामा द्या, लोकांना ठरवू द्या की कुणी ही जबाबदारी सांभाळावी. ते मला, माझ्या मुलांना आणि नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे माझ्या कुटुंबाला संरक्षण देण्याची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, अशी मागणी देखील मदन शर्मा यांनी केली. 

हेही वाचा - निवृत नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, ‘उद्धवजी गुंडाराज थांबवा’ - फडणवीस

मदन शर्मा हे कांदिवलीच्या समतानगर परिसरातील सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. काही दिवसांपासून टिव्हीवर कंगना आणि शिवसेना नेते असा वाद सुरू होता. या वादातून कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच मदन शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र सोशल मीडियावर टाकले. हे व्यंगचित्र पाहून भावना दुखावल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी शर्मा यांच्या सोसायटीबाहेर गर्दी केली. शिवसैनिकांनी शर्मा यांना बोलवून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

त्याचा फोटो माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेअर करत, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ अशी कमेंट केली होती.

त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांनी शर्मा यांचं घर गाठून त्यांचा जबाब नोंदवला. शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात कलम ३२५,१४३,१४७,१४९ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना जणांना अटक केली आहे.

हेही वाचा - म्हणून केंद्रीय गृहखात्याकडून कंगना रणौतला Y दर्जाची सुरक्षा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा