आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅप (PMC) बँक घोटाळ्याचा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेधारकांना दिलं.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा (संकल्प पत्र) मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी आर्थिक अडचणीत आलेल्या पीएमसी बँकेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर “निवडणुकीनंतर हा मुद्दा आम्ही केंद्र सरकारपुढं मांडणार आहोत. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येईल. ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करू.,” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ समूहाशी निगडित कर्जाच्या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँके (RBI)ने २४ सप्टेंबर रोजी पीएमसी बँकेवर निर्बंध घातले होते. सुरूवातीला १ हजार रूपये काढण्याची घातलेली मर्यादा वाढवून १० हजार, २५ हजार आणि त्यानंतर ४० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवरील मर्यादेमुळे ठेवीदार चिंताग्रस्त झाले आहेत.
हेही वाचा-
पीएमसी बँक घोटाळ्यातील माजी अध्यक्षाकडं 'इतकी' संपत्ती
पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त