Advertisement

'युपीत योगी सरकार आणि राज्यात निरुपयोगी सरकार'


'युपीत योगी सरकार आणि राज्यात निरुपयोगी सरकार'
SHARES

'उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे आणि राज्यात निरुपयोगी सरकार आहे', असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. 'शेतकऱ्यांचा संताप वाढू लागला आहे आणि हा संताप कमी झाला नाही तर, देशात अणुबॉम्ब टाकण्याची आवश्यकता पडणार नाही. मध्यवर्ती निवडणूका आजही घ्या आम्ही आताही तयार आहोत', असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. वांद्र्याच्या रंगशारदामध्ये लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -

  • शेतकऱ्यांचा संताप वाढू लागला आहे आणि हा संताप कमी झाला नाही तर देशात अणुबॉम्ब टाकण्याची आवश्यकता पडणार नाही.
  • उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे आणि राज्यात निरुपयोगी सरकार आहे.
  • शेतकरी जेव्हा आपले कौतूक करतो तेच आपले यश आहे.
  • शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, आमच्या नशिबात सत्ता असेल तर ती चालत येईल.
  • आम्ही मध्यावधी निवडणुकीला घाबरत नाही, उद्या काय आजही मध्यावधीला आम्ही तयार आहोत.
  • शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही बोललो तर असे वाटते की, आम्ही विरोधात बोलतो
  • भाजपाच्या विजयाबद्दल इव्हीएम मशिनला दोष देत नाही. इव्हीएम मशिन्समुळे माझे मत कुठे जातं ही माहिती मतदारांपासून हिरावली आहे.
  • तुम्ही पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न करत आहात मात्र देश मजबूत करत नाही.
  • उतरप्रदेशाच्या यशाबद्दल मी पंतप्रधानांचं अभिनंदन केले होते, मात्र गोव्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
  • गोव्यात काँग्रेसने कोणताही चेहरा दिला नव्हता तरीही भाजपापेक्षा 4 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या.
  • गाईंसाठी रुग्णालये बनवली जात आहेत, आता गाईंचेही आधार कार्ड बनवायचे सुरू झाले आहे. आधारकार्ड हा चांगला धंदा आहे
  • निवडणुकीच्या आधी चाय पे चर्चा होती. निवडणुकीनंतर गाय पे चर्चा सुरू झाली आहे.
  • आधी देश वाचवा मग गाय वाचवा, देश वाचला तर आम्ही आणि गाय वाचू.
  • हिंदूंना स्वाभिमानाने जगायला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले
  • नोटाबंदीमुळे दहशतवाद मोडला असता तर, काश्मिर पेटला नसता. नक्षलवादी हल्ले झाले नसते.
  • काश्मिर आज प्रचंड पेटलं आहे, काश्मिरमध्ये बँका लुटल्या जात आहेत. आता तिथे तर मुलीपण दगडफेक करत आहेत. हीच परिस्थिती काँग्रेसच्या काळात होती, मग तुमचं सरकार आल्याने नेमका फरक काय पडला? लोकांनी सरकार का बदलले?
  • मोदींना माझा विरोध नाही. तुम्ही तीन वर्ष राज्य केले. दोन वर्षे बाकी आहेत. आत्तापासूनच लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. लोकांनी भरपूर दिले आहे. कारभार देशासाठी करा, नेतृत्वासाठी करू नका. 
  • पाकिस्तान एका सर्जिकल स्ट्राईकने सुधारणार नाही. त्याचे तुकडे पाडा. शिवसेना तेव्हा तुमच्या खांद्याला खांदा देईल. 
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा