Advertisement

क्वारंटाईन रुग्णांसाठी बेड 2 हजारांपर्यंत वाढवा, पाहणीनंतर केंद्रिय पथकाची शिफारस

केंद्रानं नियुक्त केलेल्या पथकानं (IMCT) मुंबईत पाहणी केल्यानंतर सुविधांची क्षमता वाढवण्याची शिफारस केली आहे.

क्वारंटाईन रुग्णांसाठी बेड 2 हजारांपर्यंत वाढवा, पाहणीनंतर केंद्रिय पथकाची शिफारस
SHARES

कोरोनोव्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र किती तयार आहे आणि महाराष्ट्राच्या उपाय-योजनांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राद्वारे पथक नियुक्त करण्यात आलं आहे. केंद्रानं नियुक्त केलेल्या पथकानं (IMCT) मुंबईत पाहणी केल्यानंतर सुविधांची क्षमता वाढवण्याची शिफारस केली आहे.

महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आयएमसीटीनं सुचवल्यानुसार बेडची संख्या सध्याच्या १ हजार २०० बेडवरून वाढवून २ हजार करावी. कारण नुकतंच शहरातील COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी IMCT दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आली आहे. या दौऱ्या दरम्यान लॉकडाऊनच्या काळात आवश्यक वस्तूंचा पुरवठा, आरोग्य व्यावसायिकांच्या सुरक्षेची तपासणी आणि लॉकडाऊन दरम्यान आवश्यक उपाययोजना या सर्वासंदर्भात तपास केला.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, या पथकानं राज्य सरकारला उपचार घेत असलेल्या रूग्णांना किमान ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितलं आहे. कारण रुग्णांना श्वासोच्छवासाची समस्या असल्यास त्यांना मदत होईल. पथकानं केलेल्या शिफारशींनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) अधिक खाटांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. याशिवाय तपासण्या अधिक करण्यास देखील सांगण्यात आलं आहे. यासाठी खुल्या मैदानातही तुम्ही खाटा लाऊ शकता.

मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊन दरम्यान उपाय योजनांची अंमलबजावणीचे निरीक्षण करण्यासाठी मंगळवारी दोन पथके तैनात करण्यात आली. कोरोनोव्हायरस साथीच्या आजाराशी संबंधित महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची पाहणी केल्यानंतर या पथकानं आवश्यक सूचना दिल्या आहेत. तो अहवाल केंद्राकडे सादर केला जाईल.

केंद्रानं सहा पथकांची एक टिम तयार केली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसाठी प्रत्येकी दोन आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानसाठी प्रत्येकी एक. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हे पथक तयार करण्यात आलं. कारण या शहरातील अधिक ठिकाणं ही हॉटस्पॉट बनत होती. आयसीएमटीनं बुधवारी धारावीला भेट दिली. यावेळी राजेश टोपे यांच्यासह राज्याचे आणि बीएमसी आरोग्य विभागाचे अधिकारी होते. या पथकानं धारावी संक्रमण शिबिरातील विलगीकरण क्षेत्राला भेट दिली. मुंबईतील ३ हजार ४०० हून अधिक रुग्णांपैकी १८० रुग्ण हे धारावीतील आहेत.



हेही वाचा

मुंबईतील काॅन्टेमेंट झोनला देणार रेडआॅरेंजब्ल्यू रंग

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा