भाजपामध्ये जोरदार इनकमिंग

  Bhandup
  भाजपामध्ये जोरदार इनकमिंग
  मुंबई  -  

  भांडूप - कांजूरमार्ग, भांडूप, विक्रोळीत भाजपामध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. या इनकमिंगमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करणारे नगरसेवक मंगेश पवार सोडता भाजपाचा एकही नगरसेवक या विभागात नाही. त्यामुळे भाजापच्या बड्या नेत्याला हाताशी धरत काहींनी भाजपा प्रवेशाला सुरूवात केलीय. या सर्व प्रकारामुळे निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे भांडूपमधील 114 आणि 115 वॉर्ड वगळता सर्व वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यानं या दोन वॉर्डमधून तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.