दसरा मेळाव्यात ५ लाखांचा जनसमुदाय जमवा, शिवसेनेच्या नेत्यांचे कडक निर्देश

शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन झाले पाहिजे. भाजपला शिवसेनेची ताकद कळाली पाहिजे. राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दिशेने आपण पुढे निघालो असून त्या दृष्टीनेच हा मेळावा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी येणारा हा दसरा मेळावा असल्याने शिवसैनिकांना या मेळाव्यात महत्वाचा आदेश मिळणार असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

SHARE

अनेक वर्षाची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याची वाट प्रत्येक शिवसैनिक वर्षभर पाहत असतो. यावर्षी दसरा मेळावा आणि आगामी निवडणूक पाहता कशा प्रकारे नियोजन करता येईल, तसंच सत्तेत असलो तरी दसरा मेळाव्यात भाजपला शिवसेनेची ताकद कशी दाखवता येईल त्यासाठी शिवतीर्थावर किमान पाच लाखांचा जनसमुदाय असला पाहिजे असे कडक निर्देश शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  


शिवसेना भवनात बैठक

शिवसेना भवनात सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पारंपरिक दसरा मेळाव्याच्या आयोजनाची चर्चा करण्यात आली. ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक,  पालघर रायगड, माव़ळ, उरण, भिवंडी मतदारसंघातून या बैठकीसाठी कार्यकर्ते आले होते. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आणि रघुनाथ कुचिक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याचे समजते. पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसार यावेळी कार्यकर्त्यांना काही निर्देशही देण्यात आले.    


दुप्पट लोक आले पाहिजेत

शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन झाले पाहिजे. भाजपला शिवसेनेची ताकद कळाली पाहिजे. राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दिशेने आपण पुढे निघालो असून त्या दृष्टीनेच हा मेळावा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी येणारा हा दसरा मेळावा असल्याने शिवसैनिकांना या मेळाव्यात महत्वाचा आदेश मिळणार असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शिवाजी पार्कची क्षमता दीड ते दोन लाख लोकांची असली तरी या मेळाव्याला दुप्पट लोक आले पाहिजेत, असे निर्देशही कार्यकर्त्यांना देण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्यानी आतापासूनच मेळाव्याच्या तयारीला लागलं पाहिजे अशा सूचनाही नेत्यांनी केल्याची माहिती आहे.हेही वाचा -


राफेल विमान खरेदी घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा मोर्चा

म्हाडा, मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांच्याविरोधात बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल 

संबंधित विषय
ताज्या बातम्या