'मुंबईच्या महापौरांना अधिकारच नाहीत'

  Shivaji Park
  'मुंबईच्या महापौरांना अधिकारच नाहीत'
  मुंबई  -  

  दादर - मुंबई शहराचे 38 हजार कोटींचे बजेट असून देखील मुंबईच्या महापौराला काहीच अधिकार नसल्याची खंत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या उमेदवार विशाखा राऊत यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या 'उंगली उठाओ' या विशेष कार्यक्रमात बोलून दाखवली.

  जर मुंबईच्या महापौराला अधिकार दिले गेले तर तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांना आम्ही क्रेडिट सोमय्या समजतो. निवडणूक आली की असे खोटेनाटे आरोप करायचे असं सांगत त्यांनी सोमय्यांवर जोरदार टीका केली. निवडणुकीत असे आरोप करून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे. योग्यवेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांची संपत्ती जाहीर करतील आणि सोमय्यांच्या आरोपाला उत्तर देतील असंही त्या म्हणाल्या.

  आजही शिवसेना मराठी माणसासाठी काम करत असल्याचं विशाखा राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांना भाजपामध्ये जाऊन पश्चाताप झाला आहे. 23 तारखेनंतर ते पुन्हा शिवसेनेत येतील असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. तसेच जरी विरोधकांना वाटत असलं तरी मी माझ्या मतदारसंघात जवळपास सगळीकडे प्रचार केल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या उत्तराला ठोस प्रत्युत्तर दिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.