काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

  Churchgate
  काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
  मुंबई  -  

  मुंबई - 25 जिल्ह्यांमधल्या 165 नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसला या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळू शकलं नाही. मात्र या अपयशाचं खापर काँग्रेस नेता नारायण राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर फोडलंय. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वामुळेच पराभव झाल्याचं नारायण राणे म्हणालेत. शिवाय प्रदेश नेतृत्वाने पैसे घेऊन वशिल्यानं अपात्र उमेदवारांना तिकीट वाटप केल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. त्यामुळे काँग्रेसमधल्या या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये काहीही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

  राणेंनी केलेल्या या आरोपाचं अशोक चव्हाण यांनी खंडण केलंय. काँग्रेसमध्ये कुठलीही पदं पैसे देऊन दिलेली नाहीत. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात असं घडलेलं नाही. राणे कोणाबद्दल बोलतात ते बघावं लागेल असं अशोक चव्हाण यांनी सांगत राणे यांनी केलेले आरोप खोडलेत. तसेच राज्यात निवडणूकीच्या काळात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं समोर आलंय. भाजपाने सत्तेचा सर्रास गैरवापर केलाय. यावर पक्षातील सर्वच प्रमुख नेते मिळून निर्णय घेत आहोत. मी यावर अधिक भाष्य करणार नसल्याचं अशोक चव्हाण म्हणालेत.माझा उमेदवार पाडण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघात मदत केली होती असे विरोधी पक्षनेता विधानसभा राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. हा पक्षातील अंतर्गत कलह वरिष्ठांसोबत बैठकीत सोडवणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलंय. एकूणच काय या निमित्तानं काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.