मुंबई इंडियन्सची Historic कामगिरी; ठरली २०० टी-२० खेळणारी पहिली टीम

शनिवारी मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स विरूद्धचा सामना खेळून मुंबई इंडियन्स २०० वा टी २० सामना खेळणारी पहिली टीम ठरली आहे.

SHARE

शनिवारी मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स विरूद्धचा सामना खेळून मुंबई इंडियन्स २०० वा टी २० सामना खेळणारी पहिली टीम ठरली आहे.

जगातील पहिली टीम 

शनिवारी वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या टी २० सामन्यानंतर टी २० सामन्यांचं द्विशतक पूर्ण करणारी मुंबई इंडियन्स ही जगातील पहिली टीम ठरली आहे. आयपीएलच्या १२ व्या सीजनचा शनिवारी २७ वा सामना खेळण्यात आला. राजस्थान रॉयल्सनं या सामन्यात टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

समरसेटचा रेकॉर्ड ब्रेक

मुंबई इंडियन्सनं या सामन्यानंतर समरसेट काऊंटी टीमचा १९९ सामन्यांचा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा मान मिळवला. तिसऱ्या क्रमांकावर हँपशायर संघ असून त्यांनी आतापर्यंत १९४ मॅचेस खेळल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा क्रमांक येतो.हेही वाचा -

मोहम्मद शेखची हॅटट्रीक; तिसऱ्यांदा जिंकली सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धा
संबंधित विषय
ताज्या बातम्या