Advertisement

''आज वसुली चालू आहे की बंद?'', अमृता फडणवीसांचा 'मविआ'ला टोमणा

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षांनी हा बंद पुकारला आहे. परंतू, या बंदला भाजपानं विरोध केला आहे.

''आज वसुली चालू आहे की बंद?'', अमृता फडणवीसांचा 'मविआ'ला टोमणा
SHARES

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षांनी हा बंद पुकारला आहे. परंतू, या बंदला भाजपानं विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदवरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. अमृता यांनी ट्विट करुन एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तरही देण्याचं त्यांनी सूचवलं आहे. शिवाय, लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं काही दिवसांपूर्वी एका वेगवान कारने शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. विरोधकांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. इतकचं नव्हे तर ही वेगवान कार भाजपाच्या केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र चालवत असल्याचं आरोप झाला. युपीतील या घटनेविरुद्ध राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं बंद पुकारला आहे.

आज वसुली चालू आहे की बंद, कोणी मला अपटेड देईल का.. असे म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, १०० कोटींच्या वसुली प्रकरणाशी या बंदला जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा