भाजपा करतेय मनसेला टार्गेट

 Pali Hill
भाजपा करतेय मनसेला टार्गेट
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई – गेल्या पाच वर्षात मनसेनेच्या नगरसेवकांनी लोकोपयोगी कामे करत मतदारांच्या मनात जागा बनवली आहे. मनसेचा चांगलाच धसका भाजपाने घेतला होता. त्यामुळेच मनसेचे बालेकिल्ले जाणीवपूर्वक ढासळवण्यात आल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांनी केला आहे.नव्या प्रभाग पुर्नरचनेचा फटका सर्वाधिक मनसेच्या नगरसेवकांना बसला आहे. मनसेचे गटनेते संदिप देशपांडे, नगरसेवक संतोष धुरी प्रभागहीन झाले आहेत.

"आरक्षण हे सोडतीद्वारे काढले जात असल्याने त्याबाबत कुणालाही काही आक्षेप घेता येणार नाही. पण प्रभाग पुनर्रचना ही मानवी आहे. ती करताना भाजपला हवे त्याप्रमाणे, त्यातही मनसेला टार्गेट करत मनसेचे बालेकिल्ला असलेले प्रभाग पुनर्रचित केले गेले", असे संतोष धुरी म्हणाले.

"भाजपने मनसेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असला तरी मनसे आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर जोमात निवडणूक लढवेल आणि निवडणुकीत बाजी मारेल", असा विश्वासही धुरी यांनी व्यक्त केला आहे.

Loading Comments