दहिसर - भाजपाचे उमेदवार आणि आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौगुले नगरमध्ये राहणाऱ्या सुरेश महाडिक यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या इसमाला कांदीवलीच्या शताब्दी रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे.