नव्या नोटांवर खासबारदार यांचं बोधचिन्ह

 Pali Hill
नव्या नोटांवर खासबारदार यांचं बोधचिन्ह

मुंबई - २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेसाठी बोधचिन्ह स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये अनंत खासबारदार यांनी बनवलेल्या बोधचिन्हाला देशभरातून पहिला क्रमांक मिळाला. हेच बोधचिन्ह भारताच्या नव्या चलनी नोटांवरही छापण्यात आलंय. "याची काहीच कल्पना नव्हती. मात्र जवळच्या मित्राकडून याबद्दल माहिती मिळाल्यावर आंनद झाला आणि महराष्ट्रातून एखाद्या व्यक्तीनं बनवलेलं बोधचिन्ह नव्या २००० रुपयांच्या नोटांवर आहे याचा अभिमान आहे," अशी प्रतिक्रीया जाहिरात निर्मिती संस्थेचे संचालक अनंत खासबारदार यांनी दिलीय.

Loading Comments