कॅशलेसला संमिश्र प्रतिसाद

मुंबई- काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या घटनेला महिना पूर्ण व्हायच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅशलेस इंडियाची घोषणा केली होती. गुरुवारी त्याचं दिशेनं वेगानं मार्गक्रमण करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटलींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. त्यासाठी 11 मोठे निर्णयही जाहीर केलेत. मात्र जेटलींच्या या घोषणेवर सर्वसामान्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रीया उमटल्यात. आधी 1000-500 नोटा बंदी, मग कॅशलेश, आणि आता डिजिटलची घोषणा मोदी सरकारकडून केली गेलीय. लोकांना थोडा फार त्रास होत असला तरी मोदी सरकाच्या नव्यानव्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत होताना पाहायला मिळतय.

Loading Comments