SHARE

घाटकोपर - घाटकोपर वॉर्ड क्रमांक १३१ येथे भारतीय मानवतावादी पार्टीनं ९ ऑक्टोबरला ‘जनजागृती रॅली’चं आयोजन केलंय. ही रॅली सकाळी ११ वाजता नित्यानंद हॉटेलपासून सुरू होईल. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर आलीये. त्या पार्श्वभूमीवर या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.

या रॅलीत अनेक मागण्याही करण्यात येतील. महापालिका शाळांचा दर्जा सुधारणं, रिक्त जागा भरणं, दवाखाने-रुग्णालयांचा आणि रुग्णसेवेचा दर्जा सुधारणं आदी मागण्यांसाठी ही जनजागृती रॅली निघेल. भारतीय मानवतावादी पार्टीचे अध्यक्ष आनंदा होवाळ आणि महासचिव नागेश शिर्के या रॅलीचं नेतृत्व करतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या