गोरेगावात महाराष्ट्र जनता दलाचे संमेलन

Goregaon East
गोरेगावात महाराष्ट्र जनता दलाचे संमेलन
गोरेगावात महाराष्ट्र जनता दलाचे संमेलन
See all
मुंबई  -  

महाराष्ट्र राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता दल युनाइटेड महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये हे संमेलन पार पडले. या संमेलनात बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मुंबईकरांचे मराठीत आभार आणि स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार मधील योजना तसेच कार्य अहवालाची माहिती दिली. बिहारमध्ये आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. त्याच प्रमाणे जूलै 2015 पासून बिहारमध्ये नशाबंदी करण्यात अल्याचे नितिश कुमार यांनी सांगितले. नितिश कुमार यांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांना महाराष्ट्र जनता दल युनाइटेड पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच शशांक राव यांची मुंबई अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. तसेच यावेळी आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्रात जनता दल युनाइटेड या पक्षाच्या विस्तारासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.