भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन

  Pali Hill
  भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन
  मुंबई  -  

  मुंबई - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं सोमवारी पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 77 वर्षाच्या होत्या. काही दिवसांपासून जयवंतीबेन मेहता आजारी होत्या. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात मेहता ऊर्जामंत्रीपदी होत्या. जयवंतीबेन मेहता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मेहता यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार होतील.

  जयवंतीबेन मेहता यांचा जीवनप्रवास -

  1962 मध्ये राजकारणात प्रवेश.

  1968 मध्ये प्रथमच मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक.
  10 वर्षं त्यांनी नगरसेवकपद भूषवलं.
  आणीबाणीच्या काळात 19 महिने बंदीवास.
  1978 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवड.
  1980 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर नियुक्ती.
  1989 मध्ये पहिल्यांदाच दक्षिण-मुंबई मतदारसंघाच्या खासदार म्हणून लोकसभेवर निवड.

  1991- 1995 या कालावधीत भाजपच्या महिला मोर्चाचं अध्यक्षपद.
  1993- 95 या कालावधीत त्या भाजपच्या उपाध्यक्ष होत्या.
  2004 च्या लोकसभा निवडणुकीत जयवंतीबेन मेहता यांच्यासमोर मिलिंद देवरा यांचं आव्हान होतं. मात्र देवरा यांच्याकडून मेहता यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
  ‘मार्चिंग विथ टाईम’ या इंग्रजी आत्मचरित्राचं लेखनही त्यांनी केलं होते.
   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.