Advertisement

कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रस्त्यावर उतरत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढे येत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड
SHARES

अजित पवारांनी रातोरात घेतलेल्या भूमिकेमुळे तिन्ही पक्षातील कार्यकत्यांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रस्त्यावर उतरत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढे येत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थीतीत भावनांना आवर घाला, शरद पवारांना साथ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबतच जायचे नाही हे स्पष्ट आहे.

शरद पवार हे १२.३० वाजता बोलतील ते त्यांची एकूण राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले असून सर्व कार्यकर्त्यांना श्रद्धा आणि सबूरीचा सल्ला दिला आहे. समाज माध्यमांवर कोणताही उद्रेक होऊ देऊ नका, असे आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा