Advertisement

"हा तर मराठी माणसाचा अपमान", मुख्यमंत्र्यांचं नाव वगळल्यानं आव्हाडांची टीका

महाराष्ट्राचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव वगळल्याबद्दल मंगेशकर कुटुंबांवर आरोप केला आहे.

"हा तर मराठी माणसाचा अपमान", मुख्यमंत्र्यांचं नाव वगळल्यानं आव्हाडांची टीका
SHARES

महाराष्ट्राचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव वगळल्याबद्दल मंगेशकर कुटुंबांवर आरोप केला आहे.

उद्घाटन लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार रविवारी मुंबईत पार पडला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला सन्मान प्रदान करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगेशकरांवर निशाणा साधला.

“मंगेशकर कुटुंबीयांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रावर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे टाळले आहे. याबाबत त्यांची भूमिका अनाकलनीय आहे. मंगेशकर कुटुंबाचे हे कृत्य म्हणजे इथे राहूनही आणि या राज्यात प्रचंड लोकप्रियता मिळवूनही १२ कोटी मराठींचा अपमान करण्यासारखे आहे, असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये आमंत्रणाची प्रत शेअर करताना म्हटलं आहे.

रोहीत पवार यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi साहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते आदरणीय पवार साहेब यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांनीही प्रत्येक कलेला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. आजच्या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पुत्र म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पवार साहेबांची उपस्थिती असती तर हा कार्यक्रम अधिक गोड दिसला असता, असं ट्विट रोहीत पवार यानी केलं आहे.

तर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे याबात नाराजी व्यक्त करतना लिहीतात, #लता दिदीवर मराठी माणसाने भरभरून प्रेम केले. ठाकरे कुटूंब कायमच मंगेशकर कुटूंबाच्या पाठीशी राहिले, त्याच ठाकरे कुटुंबातील मा #उध्दवठाकरे आज महाराष्ट्राचे #मुख्यमंत्री आहेत. कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न टाकून #मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला आहे.हेही वाचा

भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रणच नाही

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा