रोजगार मेळावा

 Ghatkopar
रोजगार मेळावा
रोजगार मेळावा
रोजगार मेळावा
See all

घाटकोपर - रमाबाई कॉलनीच्या गंधकुटी विहार येथे सोमवारी सकाळी 10 वाजता ‘रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. एडीट ऑक्शनच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी हेल्पर, हाऊसकिपिंगपासून ते अधिकाऱ्यापर्यंतची संधी तरुणांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या मेळाव्यात दहावी ते पदवीधरपर्यंतचे तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात रोजगार प्रशिक्षण केंद्राची सोय उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये 500 रुपये भरून उमेद्वारांना ब्युटिशियन, कॉम्प्युटर, D.T.P., टेलरिंग आणि मोबाईल रिपेरिंगचे प्रशिक्षण घेता येणार आहे. तीन महिन्यान्याच्या प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रही मिळणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना रोजगार देखील देण्यात येणार आहे.

Loading Comments