Advertisement

राज्यात होणार 'या' विभागांमध्ये मेगाभरती

दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित तरुणांसाठी येणाऱ्या दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, पोस्ट, कृषी, मत्स्य विभाग, बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्यात होणार 'या' विभागांमध्ये मेगाभरती
SHARES

निवडणुकीपूर्वी भाजपात आमदारांची मेगाभरती झाल्यानंतर राज्याच्या प्रशासकीय विभागातही मेगाभरती केली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षित तरुणांसाठी येणाऱ्या दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, पोस्ट, कृषी, मत्स्य विभाग, बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  त्याचबरोबर  प्राप्तीकर विभाग, कस्टम्स, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी विभागांमध्येही क्लर्क पदांसाठी भरती होणार आहे.

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये तब्बल ३६५० जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून, या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ दहावी पास इतकीच आहे. नवी मुंबई, सोलापूर, पुणे, अहमदनगर, ठाणे या ठिकाणांवर भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी अर्जदार उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठीही ३ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल आहे.

ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, लातूर विभागात कृषीसेवक पदे भरली जाणार आहेत. नागपूर (२४९ पदे), अमरावती (२३९), लातूर (१६९), औरंगाबाद (११२) येथे ही पदे असतील. तसेच म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयासह राज्यातील इतर विभागीय कार्यालयांमध्ये सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचीही भरती आहे. त्यासाठी रीतसर अर्ज मागवून परीक्षा, मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध विभागांतही येत्या वर्षात भरती होणार आहे. त्यात रिझर्व्ह बँकेसह अन्य विभागांचा समावेश आहे. क्लार्क स्तरावरील ही पदं भरली जाणार असल्याचं बोललंं जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ इंजिनीयर स्तरावर ४०५ पदे रिक्त आहेत. मत्स्य विभागात सहाय्यक मत्स्य विभाग विकास अधिकारी (३७ पदे), मृद व जलसंधारण विभागात औरंगाबादसाठीही (१८२) भरती होईल.



हेही वाचा -

नौदलात 'या' पदाच्या भरणार २७०० जागा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा