Advertisement

जमिनीशी नाळ जोडलेला लोकनेता!

राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर (67) यांचं गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे शेती संदर्भात उत्तम जाण असलेला शेतकरी नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

जमिनीशी नाळ जोडलेला लोकनेता!
SHARES

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा चेहरा आणि ज्यांची नाळ नेहमीच जमिनीशी जुळलेली अशी ओळख असलेले राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर (67) यांचं गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे शेती संदर्भात उत्तम जाण असलेला शेतकरी नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


बुधवारी रुग्णालयात केलं दाखल

श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने फुंडकर यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.


भाजपचा विस्तार करण्यात योगदान

पांडुरंग पुंडलिक फुंडकर यांचा जन्म 1950 मध्ये बुलडाण्यातील खामगावमध्ये झाला. राज्यात भाजपचा विस्तार करण्यात पांडुरंग फुंडकर यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडें यांच्यासोबत राज्यात भाजपचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी सलग तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. फुंडकर यांना भाऊसाहेब देखील म्हटलं जात होतं. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार होते.


पांडुरंग फुंडकर यांची कारकिर्द

  • 1989 मध्ये पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली
  • 1991 ते 1996 या दरम्यान भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली
  • 1978 आणि 1980 साली महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले
  • 1985 पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते
  • 1991 ते 96 या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं
  • 2016 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश
  • ग्रामीण भागात भाजपला जनाधार मिळवून देण्यात फुंडकर यांचा मोठा वाटा
  • बुलडाण्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं
  • अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व त्यांनी दिल्लीत केलं
  • 9, 10, 11 अकोला लोकसभा विजयी उमेदवार
  • विधान परिषदेवर नियुक्‍ती होताच विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान
  • युती सरकारात - कापूस पणन महासंघाचे मुख्य प्रशासक
  • उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • विद्यमान सरकारात राज्याचे कृषीमंत्री

हेही वाचा -

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा