शिवस्मारकाच्या भूमी-जलपूजनानिमित्त मुंबईत रॅली

मुंबई - शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमी-जलपूजन मुंबईच्या अरबी समुद्रात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी 36 जिल्ह्यांमधून आलेल्या जल-मातीच्या कलशाची मुंबईत शोभायात्रा काढण्यात आली. चेंबूर पांजरपोळ इथून या शोभायात्रेला शुक्रवारी सकाळी सुरूवात झाली. त्यानंतर मुंबईच्या अनेक भागांतून निघालेली ही शोभायात्रा संध्याकाळी गेट वे ऑफ इंडियामध्ये समाप्त झाली.

Loading Comments