Advertisement

नाथाभाऊंना ‘रामटेक’चा मोह


नाथाभाऊंना ‘रामटेक’चा मोह
SHARES

मुंबई - महाराष्ट्रातील भाजपा नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा अजूनही बंगल्याचा मोह सुटता सुटेना. मंत्री पद गेल्यानंतरही खडसेनी शासकीय निवासस्थान असलेला ' रामटेक' बंगला सोडला नाही. आणि 15.50 लाखांची थकबाकीही असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलीय. गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना वितरित केलेला शासकीय बंगला 'रामटेक' बाबत माहिती विचारली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्यानं अनिल गलगली यांना कळविले की, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अद्याप पर्यंत 'रामटेक' बंगला शासनाच्या ताब्यात दिला नाही. 4 जून 2016 रोजी राजीनाम्यानंतर 19 जून 2016 रोजी बंगला खाली करणे आवश्यक होते. माजी मंत्र्यांस पहिले 15 दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क असते त्यानंतर 3 महिन्यासाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फूट 25 रु आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यांसाठी 50 रु इतका दंड निश्चित केला आहे. अनिल गलगली यांच्याच आरटीआयनंतर शासनाने खडसे यांना 3 महिन्याची परवानगी दिली होती. मात्र एवढे महिने उलटूनही एकनाथ खडसेंनी रामटेक निवासस्थानाचा ताबा का सोडला नाही अशी चर्चा सुरू आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा