Advertisement

मुंबई पोलीस विरुद्ध CISF, संजय पांडेचे CISFच्या महासंचालकांना पत्र

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे.

मुंबई पोलीस विरुद्ध CISF, संजय पांडेचे CISFच्या महासंचालकांना पत्र
SHARES

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून आता केंद्र विरुद्ध मुंबई पोलीस असं चित्र निर्माण झालं आहे. मात्र झेड सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीवर दोन वेळा कसा हल्ला होतो, असा जाब सीआयएसएफनं मुंबई पोलिसांना विचारला होता. त्याला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी CISFच्या महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी सीआयएसएफ सेक्युरीटी काय करत होती याची चौकशी करा, अशी सूचना संजय पांडे यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांना दिली आहे.

सोमय्यांना केंद्रसरकारची झेड सिक्युरिटी आहे. मग त्यांच्यावर हल्ला होत असताना सीआयएसएफचे जवान कुठे होते, याची चौकशी करा, अशा आशयाचं पत्र संजय पांडे यांनी लिहिलं आहे. या पत्रामुळे आता

२३ एप्रिलला राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले.

दरम्यान, खार पोलिसांनी आपल्याला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी आपल्याला अत्यंत हिन वागणूक दिली, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर आज मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पोलिस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याचा चहा पितानाच व्हिडिओच संजय पांडे यांनी ट्विट केला आहे. तसंच, त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, आणखी काही बोलायची गरज आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आपण मागासवर्गीय असल्यामुळेच मुंबई पोलिसांनी आपल्याला हीन वागणूक दिली. रात्रभर खार पोलिस स्टेशनमध्ये असताना तेथे महिला पोलिस कर्मचाऱ्याला आपण पाणी देण्याची विनंती केली होती. मात्र, आपल्याला साधे पाणीही देण्यात आले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.



हेही वाचा

नवनीत राणांच्या 'डी' गँग कनेक्शनची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता

पोलिस स्टेशनमध्ये चहा पितानाचा राणा दाम्पत्यांचा व्हिडिओ पोलिसांकडून जाहीर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा