Advertisement

पोलिस स्टेशनमध्ये चहा पितानाचा राणा दाम्पत्यांचा व्हिडिओ पोलिसांकडून जाहीर

आपण मागासवर्गीय असल्यामुळेच मुंबई पोलिसांनी आपल्याला हीन वागणूक दिल्याचा आरोप राणा दाम्पत्यांनी केला होता. त्याला पोलिसांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

पोलिस स्टेशनमध्ये चहा पितानाचा राणा दाम्पत्यांचा व्हिडिओ पोलिसांकडून जाहीर
SHARES

खार पोलिसांनी आपल्याला अटक केल्यानंतर रात्रभर पाणीही दिले नाही. पोलिसांनी आपल्याला अत्यंत हिन वागणूक दिली, असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर आज मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पोलिस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याचा चहा पितानाच व्हिडिओच संजय पांडे यांनी ट्विट केला आहे. तसंच, त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, आणखी काही बोलायची गरज आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आपण मागासवर्गीय असल्यामुळेच मुंबई पोलिसांनी आपल्याला हीन वागणूक दिली. रात्रभर खार पोलिस स्टेशनमध्ये असताना तेथे महिला पोलिस कर्मचाऱ्याला आपण पाणी देण्याची विनंती केली होती. मात्र, आपल्याला साधे पाणीही देण्यात आले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.

तसंच, याप्रकरणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार केली होती. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांवर जोरदार टीका केली. दोघांच्याही टीकेचा रोख हा संजय पांडेंवरच होता. अखेर आज नवनीत राणा यांचा पोलिस स्टेशनमध्ये चहा पितानाच व्हिडिओच संजय पांडे यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुंबई पोलिस आयुक्तांनी नवनीत राणांचा व्हिडिओ जारी केल्यानंतर भाजपने या व्हिडिओवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या व्हिडिओची फाॅरेन्सिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

केवळ महाविकास आघाडी सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी नवनीत राणांनी असे आरोप केले होते हे आता स्पष्ट झाले आहे, असे मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.हेही वाचा

FIR रद्द करण्याची राणा दाम्पत्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांचा मोठा निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा