Advertisement

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांचा मोठा निर्णय

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची सभा होणार असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रसिद्ध केला आहे.

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांचा मोठा निर्णय
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. पण आता या सभेआधी पोलिसांनी पुढील १३ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. ९ मे पर्यंत ही जमावबंदी कायम असणार आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची सभा होणार असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रसिद्ध केला आहे. सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत पोलिसांनी ही जमावबंदी लागू केली आहे.

आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिल्याशिवाय मनसे सभा घेऊ शकत नाही हे स्पष्ट आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना महाराष्ट्र दिनी अनेक पक्षांच्या सभा होत असतात आणि जर त्यांना परवानगी दिली जात असेल तर आम्हालाही परवानगी द्यावी लागेल. परवानगी मिळेल अशी खात्री असून त्यानुसार १०० टक्के सभा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध कऱण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला टीझर शेअऱ केला आहे. मनसेने टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा दिली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज यांची सभा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत. या सभेसाठी एका लाखांहून अधिक लोक जमतील अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त करण्यात आली आहे.



हेही वाचा

बिनकामाचे भोंगे... मी काडीची किंमत देत नाही, उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला

मनसेचं ३ मेचं अल्टीमेटम कायम, राज ठाकरे निर्णयावर ठाम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा